Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लोणी काळभोरमधील MIT संस्थेत विजेचा धक्का लागून तरुण कामगाराचा जागीच मृत्यू; 'वर्षभरात दुसरा बळी ; कर्मचारी-विद्यार्थ्यांची सुरक्षा 'रामभरोसे..'

लोणी काळभोरमधील MIT संस्थेत विजेचा धक्का लागून तरुण कामगाराचा जागीच मृत्यू; 'वर्षभरात दुसरा बळी ; कर्मचारी-विद्यार्थ्यांची सुरक्षा 'रामभरोसे..'

लोणी काळभोर, (पुणे) : पुणे जिल्ह्यातील नामांकित लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी शिक्षण संस्थेत काम सुरु असलेल्या ठिकाणी एका तरुणाचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची हृद्यद्रावक घटना घडली.

रविवारी (ता. 02) सकाळी पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आली. रोषण राजू चव्हाण (वय -22, रा, अष्टापूर फाटा, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयटी संकुलातील नवीन जागेत बांधकामाचे काम सुरू असून, तिथे विजेच्या तारा आणि केबल ओढण्याचे काम सुरु होते. सकाळी कामगार काम करीत असताना राजूला विजेचा शॉक लागला. विजेचा झटका इतका जोरदार होता की तो तरुण जागीच कोसळला. सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला ‘मृत’ घोषित केले. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

एमआयटी संकुलात सुरक्षेचे धिंडवडे; वर्षभरात दुसरी बळी. .

एमआयटी शैक्षणिक संकुलात कामगार, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे संस्था प्रशासनाकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे या घटनेने स्पष्ट केले आहे. वर्षभरापूर्वीच या शिक्षण संस्थेच्या हॉस्टेलमध्ये अटेंडंट म्हणून कार्यरत असलेल्या शामल संतोष आगाव (वय -34, मूळ रा. बीड, सध्या रा. गोपाळपट्टी, हडपसर) या महिला कर्मचाऱ्याचाही हॉस्टेलमध्ये विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता.

त्या गंभीर घटनेनंतरही एमआयटी प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला नाही, हेच या दुसऱ्या दुर्घटनेवरून सिद्ध होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News