Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Loni Kalbhor : "घर तात्काळ खाली कर, नाहीतर तुझा कार्यक्रम करतो" ; कुंजीरवाडीत घरात घुसून मारहाण, तोडफोड प्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल..

Loni Kalbhor : "घर तात्काळ खाली कर, नाहीतर तुझा कार्यक्रम करतो" ; कुंजीरवाडीत घरात घुसून मारहाण, तोडफोड प्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल..

Loni Kalbhor : लोणी काळभोर, (पुणे) : "लगेच घर खाली कर, नाहीतर तुझा कार्यक्रम करतो," अशी धमकी देत आरोपींनी घरात घुसून कुटुंबीयांना मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या आणि घरातील साहित्याची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.

हि घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील धुमाळमळा परिसरात शुक्रवारी (ता. २९ मे) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Loni Kalbhor

अविनाश भोसले, गोपाळ पुजारी, दोन पुरुष आणि सात महिला (सर्व रा. धुमाळमळा, कुंजीरवाडी) अशा एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी गणेश रघुनाथ भोंडवे (वय ४१, व्यवसाय - ट्रान्सपोर्ट, रा. धुमाळमळा, कुंजीरवाडी, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Loni Kalbhor

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश भोंडवे हे आपल्या घरी जेवण करत असताना आरोपी अचानक घरात घुसले. त्यांनी घर तात्काळ खाली करण्याची धमकी देत शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर अविनाश भोसले आणि त्याच्यासोबत आलेल्या इतरांनी फिर्यादीला मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. Loni Kalbhor

या प्रकाराला फिर्यादीची आई आणि आजोबांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी फिर्यादीच्या आईच्या पोटात लाथ मारल्याचा आरोप आहे. त्यानंतर कुटुंबीयांना जबरदस्तीने घराबाहेर काढून घरातील साहित्य बाहेर फेकण्यास सुरुवात करण्यात आली. Loni Kalbhor

दरम्यान, शेजारील आबासाहेब श्रीपती धुमाळ, काशिनाथ शंकर भोंडवे, इंदुबाई सुरेश धुमाळ आणि संतोष वामन धुमाळ हे वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आले. मात्र, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच "हा आमच्या ताब्याचा धंदा आहे," असे सांगत त्यांना बाजूला होण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. Loni Kalbhor

आरोपींनी घरातील फ्रिज, टीव्ही, मिक्सर आणि इतर साहित्य जबरदस्तीने बाहेर फेकून नुकसान केल्याचेही फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ३२४(४), ३३३, १८९(१)(२), १९०, १९१(२), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. Loni Kalbhor

पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे करीत आहेत. Loni Kalbhor

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News