Dailyhunt
MahaOnline server : पूर्व हवेलीत महाऑनलाइनचा सर्वर 'डाऊन' ; तांत्रिक बिघाडामुळे 'आपले सरकार' पोर्टलचे कामकाज बंद सलग तीन दिवस सेवा ठप्प! ऐन सुट्ट्यांच्या तोंडावर नागरिक हवालदिल..

MahaOnline server : पूर्व हवेलीत महाऑनलाइनचा सर्वर 'डाऊन' ; तांत्रिक बिघाडामुळे 'आपले सरकार' पोर्टलचे कामकाज बंद सलग तीन दिवस सेवा ठप्प! ऐन सुट्ट्यांच्या तोंडावर नागरिक हवालदिल..

MahaOnline server : उरुळी कांचन, (पुणे) : मागील तीन दिवसांपासून महाऑनलाइनचा सर्वर तांत्रिक कामासाठी बंद असल्याने 'आपले सरकार' पोर्टलसह महाऑनलाइनच्या सर्व सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत.

आधीच शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामांचा खोळंबा झाला असताना आता तांत्रिक बिघाडाने नागरिकांच्या अडचणीत भर टाकली आहे. MahaOnline server

पोर्टल पूर्णपणे बंद असल्याने नवीन अर्ज सादर करता येत नाहीत, तसेच ज्यांचे दाखले मंजूर झाले आहेत त्यांना त्यांची PDF फाईल डाऊनलोड करण्यातही अडथळे येत आहेत. वैद्यकीय उपचारांसाठी तातडीने लागणारे उत्पन्नाचे दाखले, रहिवास दाखला व इतर महत्त्वाचे दाखले वेळेवर मिळत नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. MahaOnline server

तीन दिवसांपासून सर्वर बंद असतानाच, शुक्रवार (ता. 01) पासून पुन्हा सलग तीन दिवस शासकीय सुट्ट्या येत आहेत. यामुळे हे पोर्टल कधी व्यवस्थित सुरू होईल, याबाबत कोणतीही स्पष्टता प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. महाऑनलाइनच्या टेक्निकल टीमकडून ही समस्या सोडवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असले तरी, यंत्रणा पूर्ववत होण्यास किती वेळ लागेल हे अद्याप अनिश्चित आहे. MahaOnline server

दरम्यान, लोणी काळभोर परिसरात शनिवार, दिनांक 2 मे रोजी होणाऱ्या 'महाराजस्व समाधान शिबिरासाठी' अर्जांची पूर्वतयारी गुरुवारी आज (ता. 30) रोजी केली जाणार होती. मात्र, पोर्टल बंद असल्याने या शिबिराच्या नियोजनावर आणि नागरिकांच्या प्रतिसादावर याचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. MahaOnline server

याबाबत लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते याबाबत बोलताना म्हणाल्या, ” हि एकट्या पुणे जिल्ह्याची समस्या नसेल संपूर्ण राज्यात हि समस्या असेल याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून निवेदन देण्यात आले आहे. MahaOnline server

कोट :
मागील 3 दिवसपासून महाऑनलाइनच्या सर्वरचे कामकाज चालू असल्यास महाऑनलाइन चा पोर्टल, व आपले सरकार पोर्टल पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे आपल्याला वैधकीय साठी उत्पन्न दाखला, रहिवास दाखला व इतर प्रकार चे कोणते हि दाखले जमा करता येणार नाही. पोर्टल कधी व्यवस्थित चालू होईन या बाबत काहीच कल्पना नाही, तरी आपण सर्वाना हि नम्र विनंती आहे कि पोर्टल सुरू होईपर्यंत आपण सर्वांनी सहकार्य करावे. MahaOnline server

राज गायकवाड, महा ई सेवा केंद्र व आधार नोंदणी केंद्र संघटना अध्यक्ष, अप्पर तहसील लोणी काळभोर, (ता. हवेली)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News