Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मोठी बातमी! 1 ऑक्टोबरपासून सिलिंडर बंद? पुण्यातील 4 लाख ग्राहकांना सरकारचा थेट इशारा

मोठी बातमी! 1 ऑक्टोबरपासून सिलिंडर बंद? पुण्यातील 4 लाख ग्राहकांना सरकारचा थेट इशारा

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील जवळपास 4 लाख कुटुंबांना LPG सिलिंडरऐवजी पाइपद्वारे मिळणाऱ्या नैसर्गिक गॅसचा वापर सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या सोसायट्यांमध्ये पाइपलाइनची सोय उपलब्ध आहे, त्यांनी 1 ऑक्टोबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे सांगण्यात आले आहे.

त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून सिलिंडर बंद होणार असल्याच समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, MNGL आणि गॅस वितरण कंपन्यांच्या मते, पाइपगॅस वापरल्याने सिलिंडरच्या रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचतो आणि हे अधिक सुरक्षित मानले जाते. याशिवाय, ज्या ग्राहकांनी अद्याप आधार कार्डाद्वारे e-KYC पडताळणी केलेली नाही, त्यांना मिळणाऱ्या अनुदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील टप्प्यात सिलिंडरचे बुकिंग सुरळीत राहण्यासाठी ग्राहकांनी ही बायोमेट्रिक प्रक्रिया त्वरित पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.

घरगुती ग्राहकांनी कोणताही ऐनवेळी होणारा खोळंबा टाळण्यासाठी आपल्या भागातील गॅस एजन्सी किंवा MNGL कार्यालयाशी संपर्क साधून योग्य ती माहिती वेळेत पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन प्रशा सनाकडून करण्यात आले आहे.

आता 1 ऑक्टोबरपासून LPG सिलिंडरऐवजी पाइपद्वारे मिळणाऱ्या नैसर्गिक गॅसचा वापर सुरू करण्याचे निर्देश दिल्यामुळे सिलिंडर वितरणावर निर्बंध का?असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.ज्या भागांमध्ये पाइपगॅसची सुविधा आधीच कार्यरत आहे, तेथील एलपीजी सिलिंडरचा पुरवठा लवकरच मर्यादित किंवा बंद केला जाऊ शकतो.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News