Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नसरापूर बलात्कार प्रकरणातील नराधमाला लवकरच होणार कठोर शिक्षा? सर्व आरोप अखेर निश्चित

नसरापूर बलात्कार प्रकरणातील नराधमाला लवकरच होणार कठोर शिक्षा? सर्व आरोप अखेर निश्चित

सरापूर: नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील खटल्याची सुनावणी गुरुवारी विशेष न्यायालयात पार पडली. या प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्यावर न्यायालयीन प्रक्रियेनुसार सर्व आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

अत्यंत वेगाने तपास पूर्ण करत, पोलिसांनी केवळ 28 दिवसांत कायदेशीर बाबी पूर्ण करून न्याय मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल आणि तपास अधिकारी या सुनावणीवेळी न्यायालयात उपस्थित होते. खटल्याच्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्ट आणि विविध वैद्यकीय चाचण्यांचे पुरावे सादर केले. आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आलेल्या युक्तिवादाला प्रत्युत्तर देण्यात आले आणि शेवटी पुराव्यांच्या आधारे आरोप सिद्ध झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचे चार्जशीट अवघ्या 15 दिवसांत दाखल केले होते. आता या प्रकरणाची सुनावणी ‘इन कॅमेरा’ पद्धतीने होणार आहे.

आरोपी भीमराव कांबळे याच्यावर ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ च्या विविध कलमांन्वये (कलम १०३(१), ६४, ६५(२), ७४, १३७(२), १४०(१)) आणि ‘पोक्सो ॲक्ट २०१२’ च्या कलम ४, ६, ८ व १२ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयात झालेल्या या महत्त्वपूर्ण सुनावणीमुळे पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय नक्कीच मिळणार आहे. पोलीस प्रशासन आता या खटल्याच्या दररोजच्या सुनावणीसाठी सज्ज झाले असून, लवकरात लवकर निकाल देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News