Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पानशेत धरण कालव्यात बुडून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून तत्काळ मदत

पानशेत धरण कालव्यात बुडून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून तत्काळ मदत

विशाल शिंदे

पानशेत : तन्मय संदीप शेठे (वय २२, रा. नऱ्हे, पुणे, मूळ गाव जुन्नर) हा युवक पानशेत धरणाच्या कालव्यात पोहण्यासाठी उतरला असताना अचानक खोल पाण्यात ओढला गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ही घटना समजताच वेल्हे पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर वेल्हे पोलीस स्टेशनचे अधिकारी किशोर शेवते यांनी तातडीने हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला पाचारण करून मदतकार्य सुरू केले. रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अवघ्या ४० ते ४५ मिनिटांत खोल पाण्यातून संबंधित युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह पोलीस व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, तन्मय शेठे हा आपल्या मित्रपरिवारातील आठ ते दहा जणांसोबत पानशेत परिसरात फिरण्यासाठी आला होता. दरम्यान पोहत असताना ही दुर्दैवी घटना घडली.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, धरण परिसर व कालव्यांमध्ये पोहताना नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News