Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
फलटणमध्ये डॉक्टरने जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये माजी मंत्री सावंतांच्या OSD वर गंभीर आरोप, आरोग्यमंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया!

फलटणमध्ये डॉक्टरने जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये माजी मंत्री सावंतांच्या OSD वर गंभीर आरोप, आरोग्यमंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया!

पुणे : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील 27 वर्षीय तरुण वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र जगन्नाथ रुपनवर यांनी सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केली. वरिष्ठांच्या मानसिक छळाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

या प्रकरणात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. डॉ. रुपनवर यांच्या आत्महत्या प्रकरणातपोलिसांत रितसर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच आरोग्य विभागाच्या चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालानंतर जिल्हा वैद्यकीय अधीक्षकांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.

डॉ. रुपनवर यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या ओएसडी (OSD) कडून दबाव आणला जात असल्याचा उल्लेख असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे.कायद्यासमोर सर्व नागरिक समान असल्याचे स्पष्ट करत आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. तपासात जो कोणी दोषी आढळेल, मग ती व्यक्ती कितीही प्रभावशाली असो, तिच्यावर कसलाही पक्षपात न करता कठोर कारवाई केली जाईल.

या दुःखाद प्रसंगी बोलताना आरोग्यमंत्र्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आवाहन केले की, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी कायदेशीर आणि घटनात्मक मार्ग उपलब्ध आहेत. स्वतःचा जीव देणे हा कोणत्याही समस्येवरचा उपाय असू शकत नाही. सर्वांनी अशा परिस्थितीत संयम ठेवून संविधानाच्या मार्गाने लढा दिला पाहिजे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News