Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pimpri Chinchwad News : सिगारेटच्या पैशांवरून पेटला वाद ; दुकानदाराला जिवंत पेटवण्याचा प्रयत्न, दोघे अटकेत

Pimpri Chinchwad News : सिगारेटच्या पैशांवरून पेटला वाद ; दुकानदाराला जिवंत पेटवण्याचा प्रयत्न, दोघे अटकेत

Pimpri Chinchwad News पिंपरी, ता. 30 : किरकोळ कारणावरून संतापजनक गुन्हा घडल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड परिसरात उघडकीस आली आहे. सिगारेटचे पैसे मागितल्याच्या कारणावरून टपरीचालकाला जिवंत पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या प्रकरणी चिखली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. Pimpri Chinchwad News

याप्रकरणी वैभव चंद्रकांत तांबारे (वय २५, रा. मोशी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सचिन सुनील पुणासे (२५, रा. मेदनकर वाडी, चाकण) आणि भूषण संजय सुरडकर (२५, रा. निघोजे, ता. खेड) या दोघांना अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. २७) रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास तळवडे येथील गणेशनगरमधील साईरत्न पान शॉप येथे घडली. Pimpri Chinchwad News

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयितांनी पान टपरीवर सिगारेट ओढल्यानंतर पैसे देण्यास नकार दिला. यावरून फिर्यादीने पैसे मागितले असता दोघांनी वाद घालत त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. काही वेळाने ते दुचाकीवरून परत आले आणि प्लास्टिकच्या पिशवीत आणलेले पेट्रोल फिर्यादीच्या अंगावर ओतले. त्यानंतर पेटती काडी फेकून त्याला जिवंत पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. Pimpri Chinchwad News

दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने फिर्यादी थोडक्यात बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News