Dailyhunt
Political News : 'पवार विरुद्ध पवार' निवडणूक यापुढे होऊ देणार नाही - सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा

Political News : 'पवार विरुद्ध पवार' निवडणूक यापुढे होऊ देणार नाही - सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा

Political News : मुंबई, : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबीय राजकारणाबाबत महत्त्वाची भूमिका जाहीर केली आहे. यापुढे 'पवार विरुद्ध पवार' अशी निवडणूक होऊ देणार नाही, असा ठाम शब्द त्यांनी दिला.

Political News

2024 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पवार कुटुंबातील सदस्य एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने मोठी राजकीय चर्चा रंगली होती. मात्र, आता अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ देणार नसल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी दिवंगत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. Political News

कुटुंबातील प्रमुख व्यक्ती अचानक गेल्यानंतर निर्माण होणाऱ्या भावनिक आणि जबाबदारीच्या परिस्थितीचा उल्लेख करत, प्रत्येक कुटुंबाला अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते, असे त्या म्हणाल्या. Political News

तसेच, पक्ष विलीनीकरणाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, हा विषय अजित पवार यांच्या मनात होता; मात्र त्यांच्या निधनानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. प्रत्येकाला लोकशाहीत आपापल्या संघटनेत काम करण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी नमूद केले. Political News

दरम्यान, "मी अधिकृतपणे सांगते, यापुढे कधीही पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होऊ देणार नाही. वेळ आली तर वेगळा निर्णय घेईन, पण अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही," असा ठाम निर्धार सुळे यांनी व्यक्त केला. Political News

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News