Dailyhunt
Pratap Sarnaik : 'बसस्थानकांवर 'नाथजल' पाण्याची बाटली 15 रुपयांतच द्या, अन्यथा परवाना रद्द - प्रताप सरनाईक यांचा इशारा

Pratap Sarnaik : 'बसस्थानकांवर 'नाथजल' पाण्याची बाटली 15 रुपयांतच द्या, अन्यथा परवाना रद्द - प्रताप सरनाईक यांचा इशारा

Pratap Sarnaik : पुणे : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकांवरील प्रवाशांना परवडणाऱ्या दरात पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्षप्रताप सरनाईक यांनी कडक भूमिका घेतली आहे.

'नाथजल' या एक लिटरच्या थंड पाण्याच्या बाटलीची किंमत १५ रुपयांपेक्षा जास्त आकारल्यास संबंधित विक्रेत्याचा परवाना रद्द करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. Pratap Sarnaik

गुरुवारी (ता. 30) सकाळी त्यांनी पुणे विभागातील लोणावळा बसस्थानकाला अचानक भेट देत प्रवासी सुविधांची पाहणी केली. यावेळी 'नाथजल'ची बाटली वाढीव दराने विकली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ संबंधित विक्रेत्याला दरफलक लावण्याच्या सूचना देत, नियमभंग सहन केला जाणार नाही, असे बजावले. Pratap Sarnaik

यावेळी प्रवाशांनी काही बसफेऱ्या बसस्थानकात न थांबता पुढे जात असल्याची तसेच काही बसेस खाजगी हॉटेलांवर थांबत असल्याची तक्रार केली. यावर कोणतीही बस खाजगी हॉटेलांवर न थांबता नियोजित वेळापत्रकानुसार बसस्थानकावरच थांबावी, असे स्पष्ट निर्देश सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले. Pratap Sarnaik

तसेच बसस्थानकातील स्वच्छता, तिकीट व्यवस्था, मूलभूत सुविधा यांचा आढावा घेत प्रवाशांना अधिक दर्जेदार आणि सुलभ सेवा देण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. प्रवासी सेवेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. Pratap Sarnaik

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News