Dailyhunt
Pune Sex Racket :   आंबेगावातील लॉजवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश , चार महिलांची सुटका, तर एजंटला अटक

Pune Sex Racket : आंबेगावातील लॉजवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश , चार महिलांची सुटका, तर एजंटला अटक

Pune Sex Racket पुणे, ता. १३ : पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर Pune Sex Racket गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने मोठी कारवाई करत चार पीडित महिलांची सुटका केली आहे.

या कारवाईदरम्यान एका एजंटला अटक करण्यात आली असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. Pune Sex Racket

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा रस्त्यावरील "द्वारका लॉजिंग अॅण्ड बोर्डिंग" येथे महिलांकडून अनैतिक व्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने माहितीची खातरजमा केली. Pune Sex Racket

बनावट ग्राहक पाठवून खात्री झाल्यानंतर पोलिसांनी लॉजवर अचानक छापा टाकला. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली. तसेच सचिन बाबुराव गायकवाड (वय २८, रा. कोंढवा, पुणे) याला एजंट म्हणून ताब्यात घेण्यात आले. तो मूळचा लातूर जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मुळज गावचा असल्याची माहिती समोर आली आहे. Pune Sex Racket

या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. Pune Sex Racket

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News