Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणेकरांनो, बसने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा! दहीहंडीमुळे PMPMLचे मार्ग बदलले

पुणेकरांनो, बसने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा! दहीहंडीमुळे PMPMLचे मार्ग बदलले

पुणे: दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीत बदल होणार आहेत. शहरातील काही प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद किंवा प्रतिबंधित करण्यात येणार असल्याने PMPML प्रशासनाने बससेवेसाठी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.

त्यामुळे 3, 4 आणि 5 सप्टेंबर रोजी प्रवाशांना नेहमीच्या मार्गाऐवजी बदललेल्या मार्गाने प्रवास करावा लागू शकतो.

5 सप्टेंबर रोजी रस्ते बंद झाल्यानंतर मार्ग क्रमांक 17 नऱ्हेगाव-शिवाजीनगर आणि मार्ग क्रमांक 50 शनिवारवाडा-सिंहगड या बस सारसबाग येथून सोडण्यात येणार आहेत. तर मार्ग क्रमांक 113, म्हणजेच अप्पा बळवंत चौक ते सांगवी, या मार्गावरील बस मनपा नदीकाठ स्थानकातून धावणार आहेत.

याशिवाय मार्ग क्रमांक 8, 9, 57, 81, 94, 108, 143, 144 आणि 283 या बसच्या मार्गातही तात्पुरता बदल करण्यात येणार आहे. या बस डेक्कन जिमखाना, मनपा भवन आणि गाडीतळ म्हणजेच जुना बाजार या भागातून चालवण्यात येतील.

मार्ग क्रमांक 2, 11, 13, 21, 37, 38 आणि रातराणी-1 या बस येताना जे. एम. रोड, डेक्कन आणि टिळक रोडचा वापर करतील. मात्र, स्वारगेटच्या दिशेने जाताना या बस नेहमीच्या बाजीराव रोडमार्गे धावतील.

दरम्यान, मार्ग क्रमांक 7, 68 आणि 202 या बस 3 आणि 4 सप्टेंबर रोजी रस्ते बंद झाल्यानंतर स्वारगेट आणि टिळक रोडमार्गे वळवण्यात येणार आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वारगेट आगारातून चालणारे मार्ग क्रमांक 3 आणि 6 हे 5 सप्टेंबर रोजी दिवसभर बंद राहणार आहेत. त्यामुळे या बसवर अवलंबून असलेल्या प्रवाशांनी पर्यायी वाहतुकीचा विचार करावा.

दहीहंडीच्या काळात गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या बसचा मार्ग तपासावा आणि आवश्यकतेनुसार अतिरिक्त वेळ राखून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News