Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! ऐन पावसाळ्यात शहराच्या 'या' महत्त्वाच्या भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! ऐन पावसाळ्यात शहराच्या 'या' महत्त्वाच्या भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

पुणे: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेने शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे बुधवार (५ ऑगस्ट) रोजी अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार असून, गुरुवारी (६ ऑगस्ट) सकाळीही कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या माहितीनुसार, पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील एस.एन.डी.डी. एम.एल.आर. झोनच्या डिलिव्हरी साईडवरील स्ल्युस व्हॉल्व्हची तातडीची दुरुस्ती आणि देखभाल करण्यात येणार आहे. या कामासाठी बुधवार दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत संबंधित भागांचा पाणीपुरवठा बंद राहील. तसेच गुरुवारी सकाळी पाणी उशिरा आणि कमी दाबाने येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आगाऊ पाण्याची साठवण करून ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणाऱ्या भागांमध्ये लॉ कॉलेज रोड, पौड रोड, शीला विहार कॉलनी, भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी, सहवास सोसायटी, क्षिप्रा सोसायटी, विठ्ठल मंदिर परिसर, गोसावी वस्ती, करिष्मा सोसायटी परिसर, बिग बाजार परिसर, बंधन सोसायटी, डी.पी. रोडचा काही भाग, मयूर कॉलनी, कर्वे रोड, एरंडवणे, दशभुजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत, भरतनगर, भरतकुंज, स्वप्नमंदिर परिसर, युको बँक कॉलनी, मंगेशकर हॉस्पिटल परिसर, वकिलनगर, नवसह्याद्री सोसायटी, ताठवडे उद्यान परिसर तसेच इतर अनेक निवासी सोसायट्यांचा समावेश आहे.

याशिवाय औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, खडकी, चिखलवाडी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल सोसायटी, सिंघ सोसायटी आणि औंधगाव परिसरातील नागरिकांनाही या पाणीबंदचा फटका बसणार आहे.

महापालिकेने नागरिकांना पाण्याचा वापर जपून करण्याचे, आवश्यक तेवढाच पाणीसाठा करून ठेवण्याचे आणि गुरुवारी पाणी कमी दाबाने येण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News