Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष वसंत मोरे पोलिसांच्या ताब्यात ; नेमकं कारण काय?

पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष वसंत मोरे पोलिसांच्या ताब्यात ; नेमकं कारण काय?

पुणे : पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. त्यांच्या या वास्तव्यामुळे हॉटेल आणि परिसराभोवती कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.मात्र, गृहमंत्री अमित शाह यांना या पुणे दौऱ्यावेळी स्थानिक पातळीवर जोरदार विरोधाचा सामना करावा लागत आहे.

जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटी चोरीच्या मुद्द्यांवरून काँग्रेससह ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरली या विरोध प्रदर्शनादरम्यान ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष वसंत मोरे आपल्या सहकाऱ्यांसह आंदोलन करण्यासाठी आले असता, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

दरम्यान या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वसंत मोरे पोलिसांच्या गाडीत बसण्यास नकार देत असताना अधिकारी त्यांना बळजबरीने गाडीत ढकलताना दिसत आहेत.याच वेळी मोरे यांनी ‘राम मंदिरातील दानचोरी’च्या मुद्द्यावरून तीव्र घोषणाबाजी केली. पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांचा मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि गळा दाबल्याचा गंभीर आरोपही मोरे यांनी केला आहे. सध्या या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार हा भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला असून मंत्री अमित शाह यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News