Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्. पहा व्हायरल Video

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्. पहा व्हायरल Video

पुणे: पुण्यातील उरुळी कांचन परिसरातून विद्यार्थिनींमधील हाणामारीची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नामांकित महाविद्यालयाबाहेर दोन विद्यार्थिनींमध्ये झालेल्या मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर दोन विद्यार्थिनींमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. सुरुवातीला झालेली शाब्दिक बाचाबाची काही क्षणांतच हाणामारीत बदलली. व्हायरल व्हिडिओमध्ये दोन्ही विद्यार्थिनी भररस्त्यात एकमेकींवर धावून जाताना, एकमेकींचे केस ओढताना आणि मारहाण करताना दिसत आहेत.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी तातडीने हस्तक्षेप करत दोघींना वेगळे केले. त्यांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

दरम्यान, हा वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वैयक्तिक वाद, गटबाजी किंवा अन्य कोणत्या कारणामुळे ही हाणामारी झाली, याचा तपास सुरू आहे.

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने महाविद्यालयांमधील शिस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, संबंधित विद्यार्थिनींची ओळख पटवून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मात्र, या प्रकरणाबाबत महाविद्यालय प्रशासन किंवा पोलिसांकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News