Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुण्यातील घटना! बायकोसोबत वाद, घटस्फोटाचा तणाव अन् तरुणाने केलं भयंकर कृत्य..

पुण्यातील घटना! बायकोसोबत वाद, घटस्फोटाचा तणाव अन् तरुणाने केलं भयंकर कृत्य..

पुणे: पुण्यातील मगरपट्टा सिटी परिसरातील अमनोरा टाऊनशिपमध्ये शनिवारी पहाटे एका 33 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हडपसर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल पटेल (वय 33) असे मृत तरुणाचे नाव आहे. ते अमनोरा टाऊनशिपमधील एका फ्लॅटमध्ये एकटे राहत होते. राहुल आणि त्यांच्या पत्नीमध्ये गेल्या काही काळापासून मतभेद सुरू होते. या वादानंतर दोघांमध्ये घटस्फोटाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

शनिवारी पहाटे ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर फ्लॅटची तपासणी करण्यात आली. मात्र, तपासादरम्यान कोणतीही चिठ्ठी किंवा तत्सम पुरावा आढळून आला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, कौटुंबिक वादासह इतर सर्व शक्यतांचा तपास केला जात आहे. संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News