Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राशीनच्या श्री जगदंबा मंदिर प्रकरणाला नवे वळण ..! मंदिराच्या मोजणीला न्यायालयाची स्थगिती

राशीनच्या श्री जगदंबा मंदिर प्रकरणाला नवे वळण ..! मंदिराच्या मोजणीला न्यायालयाची स्थगिती

ऋषभ परदेशी

पुणे : राशीन (ता.कर्जत, जि. अहिल्यानगर) येथील प्रसिद्ध श्री जगदंबा देवी मंदिराच्या मोजणीला कर्जत येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने स्थगिती दिल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

न्यायालयाने दाव्याची अंतिम सुनावणी होईपर्यंत मंदिराच्या मालमत्तेची कोणतीही मोजणी न करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित प्रशासनाला दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, श्री जगदंबा देवी मंदिराच्या मिळकतीची मोजणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांनी दिले होते. त्यानुसार भूमी अभिलेख विभागाकडून मोजणीची प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र, मंदिर परिसरातील तसेच लगतच्या जागांचे वहिवाटदार आणि मालक यांनी या मोजणीला आक्षेप घेत कर्जत येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात मनाई हुकूमासाठी दावा दाखल केला. या प्रकरणात वादींचे वकील अॅड. सचिन अरुण रेणुकर आणि अॅड. लक्ष्मीकांत दत्तात्रय क्षीरसागर यांनी न्यायालयात मांडलेली बाजू ग्राह्य धरत न्यायालयाने सिटी सर्व्हे क्रमांक १०५१ मधील मंदिराच्या मिळकतीची मोजणी करण्यास सक्त मनाई केली आहे.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, या दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत जिल्हाधिकारी, अहिल्यानगर तसेच उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, कर्जत यांनी मंदिराच्या मालमत्तेची कोणतीही मोजणी करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणात वादींच्या वतीने अॅड. सौ. पी. एस. रेणुकर (पाटील) या कामकाज पाहत असून त्यांना अॅड. एन. एस. दोभाडे यांचे सहकार्य लाभत आहे.

दरम्यान, न्यायालयाच्या या आदेशामुळे श्री जगदंबा देवी मंदिराच्या मोजणीचा विषय सध्या तरी स्थगित झाला असून, आता या प्रकरणातील अंतिम निर्णयाकडे मंदिर परिसरातील नागरिक आणि संबंधितांचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News