Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
साखरपुड्याच्या आनंदात पार्थ पवारांना अश्रू अनावर; वडिलांच्या आठवणीने जीव झाला व्याकुळ, 'तो' भावनिक क्षण कॅमेरात कैद

साखरपुड्याच्या आनंदात पार्थ पवारांना अश्रू अनावर; वडिलांच्या आठवणीने जीव झाला व्याकुळ, 'तो' भावनिक क्षण कॅमेरात कैद

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे खासदार पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा साखरपुडा पुण्यातील द रिट्स कार्लटन हॉटेलमध्ये उत्साहात पार पडला. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.

पवार कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण असला तरी समारंभात एक भावनिक प्रसंगही पाहायला मिळाला.

साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना पार्थ पवार यांना त्यांच्या वडिलांची आठवण झाली आणि त्यांना अश्रू अनावर झाले. त्या भावनिक क्षणी त्यांनी होणाऱ्या पत्नी कायनात दारा यांना मिठी मारली. हा क्षण उपस्थितांच्या मनालाही स्पर्शून गेला.

या समारंभाला ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, दत्ता भरणे, निलेश लंके, शशिकांत शिंदे, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, आदिती तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी पार्थ पवार आणि कायनात दारा यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

साखरपुडा मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडला असला, तरी विवाहसोहळा मोठ्या उत्साहात होणार आहे. पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा विवाह 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामती येथे होणार असून, या सोहळ्याकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News