Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सासवडच्या 'द फॉरेस्ट' हॉटेलवर पोलिसांचा छापा; अवैध हुक्का बारचा पर्दाफाश, 52 हजारांचा मुद्देमाल जप्त

सासवडच्या 'द फॉरेस्ट' हॉटेलवर पोलिसांचा छापा; अवैध हुक्का बारचा पर्दाफाश, 52 हजारांचा मुद्देमाल जप्त

सासवड, ता. 1 : आस्करवाडी (ता. पुरंदर) येथील 'द फॉरेस्ट' हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्का बार सुरू असल्याचा प्रकार सासवड पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघडकीस आला. पोलिसांनी छापा टाकून हुक्का पॉट, तंबाखूजन्य फ्लेवर, चिलीम व इतर साहित्य असा एकूण 52 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड पोलिसांचे पथक आस्करवाडी परिसरात पेट्रोलिंग करत असताना 'द फॉरेस्ट' हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्का विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती 30 ऑगस्ट रोजी रात्री मिळाली. त्यानंतर पंचांसमक्ष हॉटेलवर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान हॉटेलमध्ये काही ग्राहक हुक्का धूम्रपान करताना आढळले. हॉटेलच्या काउंटरवर हुक्का पॉट, हुक्का फ्लेवर, कोळसा, चिलीम व इतर साहित्य ठेवलेले आढळून आले.

या कारवाईत 10 हुक्का पॉट, तंबाखूजन्य फ्लेवरचे चार डबे, 10 चिलीम, फिल्टर पाईपचे पॅकेट, 10 रबरी पाईप आणि दोन लोखंडी चाळण्या असा एकूण 52 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी हॉटेलचा मालक राज हेमंतकुमार अहिरवार (वय 24) तसेच कर्मचारी भुपेंद्र जसवंतकुमार (वय 26) आणि संतकुमार किशोरी खंगार (वय 22) यांच्याविरुद्ध सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News