Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
श्रावणात मांसाहार मागण्यावरून वाद ; दारूच्या नशेत आलेल्या मुलाची वडिलांकडून हत्या, आई-वडील अटकेत..

श्रावणात मांसाहार मागण्यावरून वाद ; दारूच्या नशेत आलेल्या मुलाची वडिलांकडून हत्या, आई-वडील अटकेत..

पुणे : श्रावण महिन्यात दारूच्या नशेत घरी आलेल्या मुलाने मांसाहारी जेवण मागितल्याने आई-वडिलांशी वाद झाला. या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले आणि वडिलांनी केलेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाल्याची घटना वारजे माळवाडी परिसरात घडली.

विशेष म्हणजे, मुलाच्या मृत्यूची बाब आईने लपवून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी आई-वडिलांना अटक केली आहे.

महेश भागवत गायकवाड (वय 30, रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर भागवत सूर्यभान गायकवाड (वय -64) आणि पार्वती भागवत गायकवाड (वय-30) अशी अटक करण्यात आलेल्या आई-वडिलांची नावे आहेत. याबाबत महेशचा भाऊ गणेश भागवत गायकवाड (वय -34) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेशला दारूचे व्यसन होते. तो कोणतेही कामधंदे करत नसून दारू पिऊन आई-वडिलांकडे जेवण्यासाठी जात असे. दारू पिऊन आल्यानंतर तो मांसाहारी जेवणाची मागणी करत असे. मात्र, श्रावण सुरू असल्याने आई-वडील मांसाहार बनवून देत नसल्याने त्यांच्यात वारंवार वाद होत होते.

24 सोमवारी (ता. 24) रात्री महेश दारूच्या नशेत घरी आला. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्याचे आई-वडिलांशी पुन्हा मांसाहारी जेवणावरून भांडण झाले. या वादातून वडिलांनी महेशला मारहाण केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पहाटे साडेचारच्या सुमारास महेशची आई पार्वती हिने त्याचा भाऊ गणेश याला झोपेतून उठवले. 'महेश उठत नाही, त्याचे शरीर थंड पडले आहे, असे सांगून त्याला पाहण्यास सांगितले.

दरम्यान, गणेशने महेशच्या घरी जाऊन पाहिले असता तो उताणा अवस्थेत पडलेला होता. डोक्याखाली हात घातला असता गणेशच्या हाताला रक्त लागले. तसेच महेशच्या डोक्याला, नाकाला आणि तोंडाला जखमा झाल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच वारजे माळवाडी पोलिसांनी तपास सुरू केला. प्राथमिक तपासात महेशचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याचे वडील भागवत गायकवाड आणि आई पार्वती गायकवाड यांना अटक केली आहे. पुढील तपास वारजे माळवाडी पोलिस करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News