Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

भो : भोर नगरपरिषदेमध्ये ठरावाच्या मंजुरी-नामंजुरीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात राजकीय संघर्ष चांगलाच पेटला आहे. नगर परिषदेतील या वादाचे पडसाद आता सोशल मीडियावर उमटू लागले असून, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर टीका करणारी पोस्टर्स मोठ्या प्रमाणावर प्रसारित केली जात आहेत.

संबंधित ठराव नेमका मंजूर झाला की नामंजूर, यावरून दोन्ही पक्षांकडून परस्परविरोधी दावे केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर दिशाभूल केल्याचा आरोप केला असून, भाजपनेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत पलटवार केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.

या राजकीय वादामुळे भोर शहरातील नागरिकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे. नगर परिषदेच्या कामकाजात पारदर्शकता राखून संबंधित ठरावाबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावरील पोस्टरबाजीमुळे भोरचे राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, आगामी काळात या वादाला आणखी राजकीय रंग चढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News