Dailyhunt
Sunetra Pawar : बारामतीत सुनेत्रा पवारांची विजयाकडे वाटचाल; कार्यकर्त्यांना जल्लोष न करण्याचे आवाहन ; "हा विजय अजितदादांच्या स्मृतींना समर्पित"- सुनेत्रा पवार भावूक

Sunetra Pawar : बारामतीत सुनेत्रा पवारांची विजयाकडे वाटचाल; कार्यकर्त्यांना जल्लोष न करण्याचे आवाहन ; "हा विजय अजितदादांच्या स्मृतींना समर्पित"- सुनेत्रा पवार भावूक

Sunetra Pawar : बारामती, (पुणे) : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. मतमोजणीच्या आठ फेऱ्या पूर्ण झाल्या असून, पहिल्या फेरीपासूनच सुनेत्रा पवार यांनी घेतलेली आघाडी कायम आहे.

सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले, तरी सुनेत्रा पवार यांनी मात्र कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. Sunetra Pawar

निकाल जाहीर होत असताना सुनेत्रा पवार यांनी ‘एक्स’ (ट्विटर) अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना हा विजय अजित पवार यांच्या स्मृतींना समर्पित केला आहे. “आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. Sunetra Pawar

सुनेत्रा पवार यांच्या कार्यकर्त्यांना सूचना..
दादांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष म्हणून कोणत्याही मिरवणुका काढू नयेत. विजयाचा आनंद व्यक्त करताना गुलाल उधळू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कार्यकर्त्यांनी संयम राखून दादांच्या विचारांना साजेसे वर्तन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. Sunetra Pawar

नव्या बारामतीचा निर्धार
“दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी दिल्याबद्दल मी बारामतीकरांचे आभार मानते,” असे म्हणत त्यांनी हा निकाल म्हणजे एका नव्या संघर्षाची आणि नव्या बारामतीची सुरुवात असल्याचे सांगितले आहे. मतमोजणीच्या उर्वरित फेऱ्यांनंतर अधिकृत निकाल जाहीर होईल, मात्र सुनेत्रा पवारांच्या या आवाहनाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. Sunetra Pawar

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News