Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'टेम्पो हळू चालवा' एवढंच सांगितलं. अन् दोन्ही गटांत तुफान राडा; वराळे येथील घटना

'टेम्पो हळू चालवा' एवढंच सांगितलं. अन् दोन्ही गटांत तुफान राडा; वराळे येथील घटना

पिंपरी-चिंचवड: भरधाव वेगाने जाणारा टेम्पो हळू चालवण्याचा सल्ला दिल्याने सुरू झालेला वाद थेट मारामारीपर्यंत पोहोचला. तळेगाव-म्हाळुंगे परिसरातील वराळे गावात गुरुवारी (8 ऑक्टोबर) रात्री ही घटना घडली.

या संघर्षात एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला 9 टाके पडले आहेत. तर दुसऱ्या बाजूच्या एका व्यक्तीच्या डाव्या हाताचे हाड मोडले आहे. या प्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारींवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वराळे गावातून एक टेम्पो वेगाने जात होता. संभाव्य अपघात टाळण्यासाठी तो हळू चालवण्यास सांगण्यात आले. मात्र, या सूचनेवरून संबंधित व्यक्तींमध्ये वाद सुरू झाला. काही वेळातच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी दोन्ही गटांतील व्यक्तींनी लाकडी दांडक्यांसह इतर वस्तूंचा वापर करून एकमेकांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

रणजित संतोष हिवाळे (वय 30, रा. वराळे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, समाधान विलास गायकवाड (वय 28), सचिन विलास गायकवाड (वय 31) आणि विलास पांडुरंग गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात समाधान आणि सचिन गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. या हाणामारीत एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे.

दुसरीकडे, विलास गायकवाड यांनीही पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रणजित हिवाळे, अजय रोहिदास आणि अन्य 2 अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. या वेळी लाकडी दांडक्याने मारहाण केल्यामुळे त्यांच्या डाव्या हाताचे हाड मोडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News