Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. सततचा प्रवास, कामाचा ताण आणि धावपळ यामुळे त्यांना प्रचंड थकवा जाणवत होता. अखेर हा अशक्तपणा आणि ताप वाढल्यामुळे त्यांना शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील जुपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.सध्या त्यांची तब्येत पूर्णपणे स्थिर असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांत झालेल्या राजकीय घडामोडी, ‘ऑपरेशन टायगर’ आणि सचिन अहिर यांचा पक्षप्रवेश यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे सतत व्यस्त होते. त्यानंतर लगेचच राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. या लागोपाठच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना विश्रांती घेण्यासाठी अजिबात वेळ मिळाला नाही. याच दगदगीचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आणि शुक्रवारी रात्री त्यांचा त्रास अधिक वाढला.त्यानंतर त्यानां हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सर्व काही सुरळीत राहिल्यास आज म्हणजेच शनिवारी संध्याकाळपर्यंत त्यांना रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) दिली जाण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी दुपारी ठाण्यातील गंगुबाई शिंदे सभागृहात एक महत्त्वाचा राजकीय कार्यक्रम होणार होता. धुळ्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील या एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार होत्या. मात्र, ऐनवेळी उपमुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडल्यामुळे हा पक्षप्रवेशाचा सोहळा आणि त्यांचे इतर सर्व नियोजित कार्यक्रम तातडीने रद्द करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी थेट खासगी रुग्णालय गाठले.

आता त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असून रुग्णालय प्रशासनाने समर्थकांना व नागरिकांना काळजी न करण्याचे आवाहन केले आहे. संध्याकाळनंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली घरी सोडण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News