Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
उरुळी कांचन-शिंदवणे रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात; ओव्हरटेक करताना दोन तरुण 100 फूट घसरले, थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद; पहा Video

उरुळी कांचन-शिंदवणे रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात; ओव्हरटेक करताना दोन तरुण 100 फूट घसरले, थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद; पहा Video

रुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन-शिंदवणे रस्त्यावरील काळेशिवार परिसरात एका भरधाव दुचाकीचा अपघात झाला आहे. समोरून येणाऱ्या किंवा जाणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट रस्त्यावर घसरली.

हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीसह दोन्ही तरुण रस्त्यावरून तब्बल 100 ते 110 फूट लांब अंतरापर्यंत घसरत गेले. हा थरारक अपघात जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना गुरुवारी (ता. 30) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात गंभीर जखमी झालेले दोन्ही तरुण उरुळी कांचन येथील चौधरी माथा परिसरातील रहिवासी असल्याचे समजते. जखमी तरुणांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व प्रवाशांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुचाकीवरून पडलेल्या दोन्ही तरुणांना तातडीने कदम रुग्णवाहिकेतून उरुळी कांचन येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोन्ही तरुणांना गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

उरुळी कांचन ते शिंदवणे हा रस्ता अरुंद आणि वळणावळणाचा असल्याने या मार्गावर नेहमीच अपघातांची मालिका सुरू असते. गुरुवारी सायंकाळी देखील भरधाव वेगात असलेल्या दुचाकीचालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, मात्र वेग जास्त असल्याने गाडी अचानक घसरली.

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर अपघाताची तीव्रता समोर आली असून, १०० फुटांपेक्षा जास्त अंतर घसरत गेल्याने तरुण रस्त्याला घासले जाऊन गंभीर जखमी झाले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News