Dailyhunt
Yavat News : दौंड तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ! राहुत घरफोडी तर वाखारीत वृद्धेचे दागिने लंपास ; दोन घटनेत सुमारे सात लाखांचा ऐवज चोरीला..

Yavat News : दौंड तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ! राहुत घरफोडी तर वाखारीत वृद्धेचे दागिने लंपास ; दोन घटनेत सुमारे सात लाखांचा ऐवज चोरीला..

Yavat News : यवत, ता. 30 : दौंड तालुक्यात चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, चोरट्यांनी एकाच दिवशी दोन ठिकाणी हात साफ केला आहे. राहु येथे मजुरी करणाऱ्या कुटुंबाच्या घरातील रोख रकमेसह दागिने असलेली पेटी पळवली, तर वाखारीत बसमधून उतरताना एका वृद्धेचे 4 लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत.

Yavat News

पहिल्या घटनेत राहु (ता. दौंड) येथील दशरथ रामभाऊ काळे यांच्या घरात अज्ञात चोरटा शिरला. यावेळी घरामध्ये असलेली पत्र्याच्या पेटीतील अडीच लाख रुपये रोख, सोन्याचे दागिने आणि नवीन साड्या असलेले साहित्य असा 2 लाख 97 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेहला हि घटना मंगळवारी (ता. 28) सकाळी सहा ते रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी यवत पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम ३०५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. Yavat News

दुसऱ्या घटनेत फिर्यादी शशिकला विनायक भोसले (रा. रावेत, पुणे) या पीएमटी बसने प्रवास करत होत्या. वाखारी येथील निर्माण हॉटेलसमोरील बस स्टॉपवरून बसमधून खाली उतरत असताना चोरट्याने त्यांच्या पर्समधून सोन्याचे दागिने लंपास केले. यावेळी पर्समध्ये 3 लाख ५० हजार रुपये किमतीच्या 5 तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या पाटल्या आणि ६४ हजार रुपये किमतीची सोन्याची माळ असा 4 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेहाला. Yavat News

दरम्यान, भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार यवत पोलिसांनी भा.न्या.सं. कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही घटनांमुळे दौंड परिसरात भीतीचे वातावरण असून, यवत पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत. Yavat News

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News