Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Devendra Fadanvis : अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadanvis : अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Pune Update News 1 month ago

Pune नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या महाराष्ट्रात (Devendra Fadanvis) मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या प्रकरणात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांच्यात १७ वेळा फोन कॉल्स झाल्याचा दावा केला होता.

त्यांनी सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) च्या आधारे हा खुलासा केल्याचे सांगितले होते. मात्र, दमानिया यांच्याकडे हा सीडीआर कसा आला, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, "अशा पद्धतीने सीडीआर प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. तो अधिकार फक्त संबंधित तपास यंत्रणेलाच आहे. त्यामुळे हा सीडीआर कशा पद्धतीने लीक झाला? तो कुणी लीक केला? या संदर्भातील चौकशी राज्य सरकार करेल."

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "मला वाटतं अशा संवेदनशील केसमध्ये आरोप-प्रत्यारोप करून चालत नाही. ज्याच्याविरुद्ध सबळ पुरावा असेल, त्यांच्याविरुद्ध कारवाई होईल. कोण कोणाशी बोललं, कोणी कोणाशी काय केलं, याच्या आधारावर यंत्रणा काम करत नाही. अशोक खरात याने जी काही घाणेरडी कामं केली आहेत, त्यात जर कोणी सहभागी असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही. त्यामुळे हा सीडीआर कुठून आला, याचीही चौकशी राज्य सरकार करेल."

दरम्यान, अशोक खरातच्या संपत्तीचा पूर्ण तपास करण्यात येणार असल्याचे फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितले. ते म्हणाले, "खरातने वेगवेगळे अकाउंट उघडले आहेत, ते आमच्या लक्षात आले आहेत. त्याचे वेगवेगळे ट्रान्झॅक्शनही आमच्या नजरेत आले आहेत. आता या प्रकरणात लोक स्वतःहून समोर येऊन माहिती देत आहेत. त्यामुळे एसआयटीला मोठ्या प्रमाणात माहिती प्राप्त झाली आहे. या प्रकरणाची सर्व पाळेमुळे आम्ही खोदून काढू."

फडणवीस यांनी एसआयटीच्या कामावर विश्वास व्यक्त केला. "मला वाटतं एसआयटी योग्य पद्धतीने काम करत आहे. सर्वांनी एसआयटीवर विश्वास ठेवावा," असेही त्यांनी नमूद केले.

Pune कोथरुड मतदारसंघातील बाणेर-बालेवाडी-पाषाण- सोमेश्वरवाडी- सुतारवाडी भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मिसिंग लिंक पूर्ण करणे आवश्यक…

Pune Ganpati bappa पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचा वाद अखेर मिटला आहे. मानाचे गणपती सकाळी ९.३० वाजता…

पुणे प्रतिनिधी- राज्यातील 21 हजार कार्यकारी सोसायटींबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय सहकार…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Update News