Dailyhunt
PMC News : आयुक्त आणि स्थायी समिती अध्यक्षांमध्ये जुंपली! "जिथून आलात तिथे परत जावे लागेल" म्हणत धमकी?

PMC News : आयुक्त आणि स्थायी समिती अध्यक्षांमध्ये जुंपली! "जिथून आलात तिथे परत जावे लागेल" म्हणत धमकी?

Pune Update News 3 weeks ago

पुणे शहरातील जाहिरात फलक उभारण्यासाठी तयार केलेल्या प्रस्तावावरून पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोठा राडा झाला. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले ( Shrinath Bhimale) यांनी अतिरिक्त आयुक्त प्राजीत नायर यांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाने शहरातील सार्वजनिक ठिकाणी जाहिरात फलक उभारण्यासाठी मोठे धोरण तयार केले आहे. या धोरणातून सुमारे १७०० कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित असून, ४ हजारांहून अधिक जाहिरात फलक उभारले जाणार आहेत.

या प्रस्तावात संबंधित कंपन्यांनी महापालिकेला ३० टक्के महसूल देण्याची तरतूद आहे. मात्र, अतिरिक्त आयुक्त प्राजीत नायर यांनी या उत्पन्नाचे गणित जीएसटीच्या आधारे निश्चित करावे, असा मुद्दा उपस्थित केला. यामुळे पारदर्शकता वाढेल आणि महापालिकेचे नुकसान होणार नाही, असे त्यांचे मत होते.

सभेदरम्यान श्रीनाथ भिमाले यांनी त्वरित प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी केली. मात्र, नायर यांनी त्यास नकार दिल्यानंतर वातावरण तंग झाले. त्याचवेळी भिमाले यांनी "बैठकीत बघून घेतो" अशी धमकी दिल्याचे सांगितले जाते.

घटनेमुळे आयुक्त नवल किशोर राम (Naval Kishore Ram) देखील नाराज झाल्याची माहिती आहे. वाद वाढत असल्याने काही नगरसेवकांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. हा वाद वाढत असल्याने महापौर मंजूषा नागपुरे यांनी सभागृहनेते गणेश बिडकर यांना बोलावून घेऊन हे प्रकरण शांत केले.

श्रीनाथ भिमाले यांनी मात्र कोणताही वाद किंवा धमकी दिल्याचे नाकारले असून, "माझ्याबाबत खोटी माहिती पसरवली जात आहे," असे स्पष्टीकरण दिले आहे.

या धोरणात सार्वजनिक जागा, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, विद्युत खांब यासह अन्य ठिकाणी ४ हजार २२४ जाहिरात फलक लावले जाणार आहेत. या धोरणाला मान्यता मिळाल्यानंतर २ लाख ७१ हजार ५२ चौरस फुटाचे जाहिरात क्षेत्र उपलब्ध होणार आहे. यामध्ये संबंधित कंपनी महापालिकेला ३० टक्के वाटा देणार आहे.

पौड प्रतिनिधी -: पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत इतर मागास प्रवर्गातील राखीव जागांवर खऱ्या ओबीसींना…

अजिंठा - वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप संपन्न छत्रपती संभाजीनगर : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी…

Pune पुण्यातील नवले पुलानंतर कात्रज, कोंढवा रस्ता मृत्यूचा सापळा ठरतोय. सोमवारी या परिसरात झालेल्या एका…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Update News