Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रौप्यपदक विजेती कु. शौर्या दिलीप भरणे हिचा भाजपा गटनेते शिवाजी बुचडे पाटील यांच्या हस्ते गौरव

रौप्यपदक विजेती कु. शौर्या दिलीप भरणे हिचा भाजपा गटनेते शिवाजी बुचडे पाटील यांच्या हस्ते गौरव

Pune Update News 1 week ago

मुळशी प्रतिनिधी -: (puneupdatenews.in):- जर्मनी येथे आयोजित करण्यात आलेल्या ज्युनिअर वर्ल्ड शूटिंग स्पर्धेत भारतासाठी रौप्यपदक पटकावत देशाचा मान उंचावणारी मुळशी तालुक्याची माण गावची कन्या विश्वविजेती नेमबाज कु.

शौर्या दिलीप भरणे हिचा विशेष सत्कार करण्यात आला.

पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे गटनेते शिवाजी बुचडे पाटील यांनी शौर्या भरणे व तिच्या कुटुंबीयांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. उपस्थित मान्यवरांनी तिच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

यावेळी शिवाजी बुचडे पाटील म्हणाले की "कु. शौर्या भरणे हिने आपल्या अथक परिश्रम, शिस्त, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला आहे. तिचे यश हे केवळ मुळशी तालुक्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी अभिमानाची बाब असून नव्या पिढीतील खेळाडूंना प्रेरणा देणारे आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Update News