Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
खारघरमध्ये दाम्पत्याला दगडाने मारहाण; एकजण अटकेत

खारघरमध्ये दाम्पत्याला दगडाने मारहाण; एकजण अटकेत

नवेल | खारघरमध्ये पहाटेच्या सुमारास दाम्पत्याला दगडाने मारहाण करून त्यांच्याकडील सुमारे ९५ हजार रुपये किमतीचा आयफोन १५ प्रो मॅक्स लंपास केल्याची घटना घडली.

याप्रकरणी खारघर पोलिसांनी रबिलाल रोबन टुडू (वय ३२) याला अटक केली आहे.

खारघर टोलनाक्याजवळ गणपती तलावाकडे जाणार्‍या पादचारी पुलावर ही घटना घडली. तक्रारदार प्रगती सुरेश घंगाळे ऊर्फ प्रगती रोहन खिलारी (वय २९) आणि त्यांचे पती रोहन खिलारी तेथून जात असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांना दगडाने मारहाण केली.

यानंतर आरोपीने दाम्पत्याकडील आयफोन घेऊन घटनास्थळावरून पलायन केले. या हल्ल्यात रोहन खिलारी जखमी झाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Raigad Times