Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
म्हसळ्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पाचजणांविरोधात गुन्हा

म्हसळ्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पाचजणांविरोधात गुन्हा

म्हसळा | रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच ओळखीच्या तरुणांसह घराचे काम करणार्‍या मिस्त्रीने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, वाशी हवेली, ता. तळा येथील एका तरुणाने आणि त्याच्या साथीदारांनी तिला धमकावून तसेच फसवून वेळोवेळी बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, एप्रिल २०२६ ते जून २०२६ या कालावधीत पीडितेच्या घराचे काम करणार्‍या मिस्त्रीने ती अल्पवयीन असल्याची माहिती असूनही, घरात कोणी नसल्याचा फायदा घेत जबरदस्तीने घरात प्रवेश केला आणि तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी म्हसळा पोलिसांनी भादंवि कलम ३७६(२) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम मधील कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेने म्हसळा तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर कारवाई केली असून, पाच आरोपींपैकी दोघे अल्पवयीन असल्याची माहिती आहे. पोलीस उपअधीक्षक तसेच म्हसळा पोलीस ठाण्याचे अधिकारी राजेंद्र जाधव आणि सपोनि चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास म्हसळा पोलीस करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Raigad Times