Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पिसाळलेला कुत्रा ६ वर्षीय चिमुकल्यासह सात जणांना चावला

पिसाळलेला कुत्रा ६ वर्षीय चिमुकल्यासह सात जणांना चावला

र्जत | कर्जत शहरातील महावीर पेठ परिसरात रविवारी (२४ मे) सकाळी पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने धुमाकूळ घालत सहा वर्षांच्या चिमुकल्यासह सात ते आठ जणांना चावा घेतल्याची घटना घडली. या प्रकारामुळे मुख्य बाजारपेठेत भीती आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सांडशी येथील शिव परेश शिर्के (वय ६) या बालकाला पद्मावती ज्वेलर्ससमोर कुत्र्याने अचानक हल्ला केला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. सुदैवाने नागरिकांनी तातडीने मदत केल्याने मोठा अनर्थ टळला. जखमी बालकावर कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

याच कुत्र्याने दीपक ठाकूर (वय ३०, क्रांतीनगर भिसेगाव) आणि रंजनलाल गुप्ता (वय ४०, नेरळ) यांनाही चावा घेतला आहे. आणखी काही जणांवरही उपचार सुरू आहेत. घटनेनंतर कर्जत नगरपरिषद प्रशासनाने तातडीने पथक पाठवून पिसाळलेल्या कुत्र्याला ताब्यात घेतले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Raigad Times