Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
उरण-मोरा मार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा मृत्यू

उरण-मोरा मार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा मृत्यू

रण | उरण ते मोरा मार्गावरील हरिश्चंद्र गावंड उद्यानासमोर सोमवारी (दि.१) पहाटे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

अपघातस्थळी स्पीड बे्रकर बसविण्याची मागणी आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

महेश प्रल्हाद चांदेकर (वय ३५, रा. बोरी मागिरदेव परिसर, डोंगरआळी, उरण) हे दुचाकीवरून मोरा येथून उरणकडे येत होते. त्याचवेळी निखील दिपक कुकडे (वय ३८, रा. शिवसागर अपार्टमेंट, नागाव पोलीस लाईनसमोर, नागाव रोड, उरण) हे बुलेटवरून उरणहून मोरा दिशेने जात होते. हरिश्चंद्र गावंड उद्यानासमोर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली.

या भीषण अपघातात दोघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले. अपघाताची माहिती मिळताच उरण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र सकाळी ३.४० व ३.४५ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. उरण-मोरा मार्ग हा हायवेसदृश असल्याने या रस्त्यावर वाहने मोठ्या वेगाने धावतात. संबंधित ठिकाणी गतिरोधक असता तर वाहनांचा वेग कमी होऊन हा अपघात टाळता आला असता, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Raigad Times