Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'100 टक्के शुद्ध'चा दावा डाबरला महागात! मध, तेल, तुपासह अनेक उत्पादनांवर बंदी

'100 टक्के शुद्ध'चा दावा डाबरला महागात! मध, तेल, तुपासह अनेक उत्पादनांवर बंदी

सामना 4 days ago

प्रसिद्ध डाबर इंडियाला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय)ने जोरदार धक्का दिला आहे. डाबर इंडियाने ग्राहकांची दिशाभूल करून नियमांशी विसंगत दावे केल्याचे उघड झाल्याने 'एफएसएसएआय'ने कारवाई करत डाबरच्या मध, अॅपल सायडर व्हिनेगर, व्हर्जिन कोकोनट ऑइल, तिळाचे तेल, देशी तूप, नारळाचे पाणी आणि नारळाचे दूध यांसह अनेक उत्पादनांवर बंदी घातली असून पुढील 15 दिवसात यासंबंधी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

पंपनीच्या वेबसाइटवर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर अनेक प्रकारचे दिशाभूल करणारे '100 टक्के' दावे आढळले होते. यामध्ये '100 टक्के नैसर्गिक', '100 टक्के शुद्ध', '100 टक्के शुद्धतेची हमी', '100 टक्के सेंद्रिय' आणि '100 टक्के कोवळ्या नारळाचे पाणी' यांसारखे लेबल समाविष्ट होते. हे सर्व नियमांचे उल्लंघन करणारे होते.

कंपनीला 15 दिवसांची मुदत

'एफएसएसएआय'ने डाबर इंडियाला सर्व संबंधित उत्पादनांची विक्री त्वरित थांबवण्याचे आदेश दिले असून, नियमांचे पालन केल्याचा कृती अहवाल 15 दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana