Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
680 रुपयांच्या लाईटची 9 हजारांना खरेदी, मेंटेनन्स अँड इंजिनीयर विभागाची होणार चौकशी

680 रुपयांच्या लाईटची 9 हजारांना खरेदी, मेंटेनन्स अँड इंजिनीयर विभागाची होणार चौकशी

सामना 1 week ago

स्कायवॉकखाली चांगल्या दर्जाचे लाईट लावण्याच्या नावाखाली केवळ 680 रुपयांच्या लाईट चक्क 9 हजार 993 रुपयांना खरेदी केल्याचा गंभीर आरोप सत्ताधारी पक्षाचे मकरंद नार्वेकर यांनी केला. यामध्ये तब्बल 63 कोटींचा घोटाळा झाल्याचेही ते म्हणाले.

त्यामुळे या प्रकरणी मेंटेनन्स आणि इंजिनीयरिंग विभागाची चौकशी करा आणि 15 दिवसांत अहवाल सादर करा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले.

मुंबईतील स्कायवॉकच्या खाली चांगल्या दर्जाचे लाईट लावा, असे निर्देश राज्य सरकारने मुंबई महापालिका प्रशासनाला दिले होते. यानुसार पालिकेच्या मेंटेनन्स अँड इंजिनिअर विभागाने जेम पोर्टलवरून 680 रुपयांचे लाईट चक्क 9 हजार 993 रुपयांना खरेदी केले आणि लावले. विशेष म्हणजे इतक्या महागातले लाईट खरेदी करुनही आठ दिवस उजळले नाही. प्रशासकाच्या कार्यकाळात अशाच प्रकारे घोटाळे झाल्याचा आरोपही यावेळी नार्वेकर यांनी करीत चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीतील सर्व कामांची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी नार्वेकर यांचा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला. याच वेळी काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी मध्यवर्ती खरेदी विभागाचीही चौकशी करण्याची मागणी करत, मागील चार वर्षांतील सर्व व्यवहारांवर श्वेतपत्रिका काढा अशी मागणी केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana