Dailyhunt
9 लाखांची सोनसाखळी कोणाची? क्रिकेटपटूचा आरोप अन् अभिनेत्रीला अटक

9 लाखांची सोनसाखळी कोणाची? क्रिकेटपटूचा आरोप अन् अभिनेत्रीला अटक

सामना 0 months ago

श्रीलंकन क्रिकेटपटू भानुका राजपक्षे आणि अभिनेत्री हर्षी रसंगा यांच्यातील सोन्याच्या साखळीचा वाद सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. राजपक्षे यांनी हर्षीला 9 लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी तात्पुरती वापरण्यास दिली होती, मात्र तिने कोणतीही कल्पना न देता ती साखळी गहाण ठेवल्याचा आरोप करत कायदेशीर नोटीस बजावली.

या तक्रारीनंतर थलंगगामा पोलिसांनी हर्षीला अटक केली. न्यायालयाने तिला 5 लाखांच्या दोन जामीन जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला असून, पुढील सुनावणीत साखळी न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयात सुनावणी दरम्यान हर्षीने साखळी गहाण ठेवल्याची कबुली दिली होती आणि ती परत करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, जामीन मिळाल्यानंतर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून पूर्णपणे वेगळी बाजू मांडली आहे. राजपक्षे यांच्याशी रिलेशनशिपमध्ये असताना त्यांनी ही साखळी तिला भेट म्हणून दिली होती, असा दावा हर्षीने केला आहे. अभिनेत्रीच्या या यु-टर्नमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, अद्याप राजपक्षे यांच्याकडून या दाव्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

क्रिकेटचा हरवलेला हिरा गेला! मुंबईचे 'विव्ह रिचर्ड्स' अनिल गुरव यांचे निधन

भानुका राजपक्षे हा श्रीलंकेचा आक्रमक फलंदाज असून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर 5 वनडे आणि 45 टी-20 सामने खेळले आहेत. तसेच, तो आयपीएलमध्ये ‘पंजाब किंग्स’ संघाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. 2022 आणि 2023 च्या मोसमात त्याने या संघासाठी फलंदाजी केली होती. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 एप्रिल रोजी होणार असून, त्या दिवशी सोन्याची साखळी न्यायालयात जमा करावी लागणार आहे. त्या सुनावणीत नक्की काय सत्य बाहेर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana