जनगणना 2027 मध्ये व्यापक प्रमाणात डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाणार आहे. जनगणनेच्या इतिहासात प्रथमच स्व-गणना पद्धत सुरू करण्यात आली असून त्या माध्यमातून व्यक्तींना जनगणनेशी निगडित त्यांचा कौटुंबिक तपशील स्वतंत्रपणे ऑनलाईन पूर्ण भरता येईल आणि सादर करता येईल.
2027 मध्ये पहिल्यांदाच अशी स्व-गणना होणार आहे.
महाराष्ट्र राज्यासाठी, घर-यादी आणि गृहगणनेचा कालावधी सुरू होण्यापूर्वी स्व-गणना करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून तो 1 मे 2026 ते 15 मे 2026 असा आहे. राज्याच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी ही माहिती दिली. देशाच्या रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने https://se.census.gov.in हे वेब पोर्टल विकसित केले असून ते जनगणनेत सहभागी होण्यासाठी एक सुरक्षित आणि सुलभ माध्यम आहे.

