‘आप’च्या (AAP) सात राज्यसभा खासदारांनी नुकताच भाजप मध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पक्षाच्या आमदारांसह मंगळवारी सकाळी दिल्लीकडे रवाना झाले.
२४ एप्रिल रोजी ‘आप’ला मोठा धक्का बसला. ‘आप’च्या राघव चड्ढा, अशोक मित्तल, संदीप पाठक, हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, विक्रमजीत साहनी आणि स्वाती मालीवाल अशा १० पैकी ७ राज्यसभा खासदारांनी पक्षावर आरोप करत भाजपमध्ये प्रवेश केले.
आप सोडणाऱ्या सात खासदारांपैकी सहा खासदार पंजाबमधील होते. मान यांची राष्ट्रपतींसोबतची ही भेट आज दुपारी १२ वाजता राष्ट्रपती भवनात नियोजित आहे.

