Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अ‍ॅपलच्या नव्या सीईओंना 500 कोटींचे पॅकेज

अ‍ॅपलच्या नव्या सीईओंना 500 कोटींचे पॅकेज

सामना 1 week ago

‍ॅपल कंपनीचे नवे सीईओ जॉन टर्नस यांना पुढील आर्थिक वर्षात जवळपास 58 दशलक्ष डॉलर म्हणजेच 500 कोटी रुपये वार्षिक पॅकेज दिले जाणार आहे, तर 15 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर सीईओपदावरून पायउतार झालेले आणि आता कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह चेअरमनपदी विराजमान झालेले टिम कुक यांना वर्षाला 47 दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास 404 कोटी रुपये मानधन मिळणार आहे.

अ‍ॅपलच्या हार्डवेअर अभियांत्रिकी विभागाचे माजी प्रमुख राहिलेल्या जॉन टर्नस यांनी 1 सप्टेंबर 2026 रोजी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची धुरा हाती घेतली आहे. त्यांना मूळ वेतन प्रतिवर्ष 3 दशलक्ष डॉलर म्हणजेच 25.8 कोटी रुपये, स्टॉक शेअर्स आर्थिक वर्ष 2027 साठी तब्बल 55 दशलक्ष डॉलर म्हणजेच 473 कोटी रुपये, कामगिरीवर आधारित 55 दशलक्ष डॉलरपैकी 75 टक्के शेअर्स हे अ‍ॅपलच्या निर्देशांकातील कामगिरीवर अवलंबून असतील, तर उर्वरित 25 टक्के शेअर्स टर्नस यांना पुढील चार वर्षांत दर सहा महिन्यांनी टप्प्याटप्प्याने दिले जातील.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana