Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आरेतील आदिवासी महिला होणार स्वावलंबी, मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ

आरेतील आदिवासी महिला होणार स्वावलंबी, मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ

सामना 2 weeks ago

गोरेगाव पूर्व येथील आरे परिसरातील 27 आदिवासी पाडय़ांमधील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रशिक्षण केंद्रात अत्याधुनिक शिलाई मशीन बसविण्यात आल्या असून महिलांना त्यांच्या पाडय़ातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

अभिषेक शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने खांबाचा पाडा, युनिट क्र. 25 येथे हे शिलाई प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचा शुभारंभ शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू तसेच उद्योजक के. एन. पिपंळे यांच्या हस्ते पार पडले.

कार्यक्रमाला समाजसेविका सुनीता निवळे, उद्योजिका सारिका ताठारे, प्रशांत पागे, संस्थेच्या अध्यक्षा सुनीता नागरे, प्रसाद मराठे, मधुकुमार राठी, वनिता सुतार, अभिषेक नागरे, सुरज विश्वकर्मा उपस्थित होते. संस्थेच्या कार्याचे काwतुक करताना आमदार सुनील प्रभू म्हणाले, आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणासाठी संस्था मोठे काम उभारत आहे. महिलांकडून दर्जेदार कापडी पिशव्या व इतर वस्तू तयार करून त्यांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्याची जबाबदारी संस्थेने उचलली आहे. या प्रकल्पाला सीएसआर निधी देणारे उद्योजक के. एन. पिंपळे यांचेही त्यांनी विशेष कौतुक केले. नगरसेवक असताना खांबाच्या पाडय़ातील आदिवासी बांधवांशी त्यांचे घट्ट नाते निर्माण झाले होते. येथील सण-उत्सवात सहभाग तसेच विविध समस्यांवर त्वरित उपाययोजना केल्याच्या आठवणी प्रभू यांनी यावेळी जागवल्या. आरेतील 27 पाडय़ांच्या विकासासाठी पालिकेकडून निधी मिळवून देण्याची माहितीही त्यांनी दिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana