Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आसाममध्ये पुराचा फटका, 85 जणांचा मृत्यू; शेकडो गावे पाण्याखाली, दीड लाख लोक बेघर

आसाममध्ये पुराचा फटका, 85 जणांचा मृत्यू; शेकडो गावे पाण्याखाली, दीड लाख लोक बेघर

सामना 1 week ago

साममध्ये मुसळधार पावसामुळे पुराचे गंभीर संकट ओढावले आहे. शेकडो गावे पाण्याखाली गेली असून आतापर्यंत 85 जणांचा मृत्यू झाला असून 1.35 लाख लोक बेघर झाले आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांत पुराच्या पाण्याच्या पातळीत किंचित घट झाली असली तरी राज्यातील लाखो लोक संकटाचा सामना करत आहेत.

पुरामुळे राज्यातील शिवसागर, चराईदेव, जोरहाट, डिब्रुगढ आणि गोलाघाट या जिल्ल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. शिवसागर जिल्ह्यात 55 हजारांहून अधिक लोक पुराच्या विळख्यात अडकले आहेत. पुरामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून 15 हजार हेक्टरहून अधिक शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. शेकडो घरे, रस्ते, पूल नदीचे बांध पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. राज्य सरकारकडून शेकडो मदत छावण्या आणि सहाय्यता पेंद्रे सुरू करण्यात आली आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके पूरग्रस्तांना अन्न, पिण्याचे पाणी आणि औषधे पुरवण्याचे काम करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana