Monday, 07 Oct, 4.06 am सामना

ठळक बातम्या
आता कपल्सला हॉटेलमध्ये एकत्र राहता येणार, 'या' मुस्लीम राष्ट्राचा मोठा निर्णय

मुस्लीम राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सौदी अरेबियाने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेचा विस्तार होण्यासाठी व्हीसा नितीमध्ये सुधारणा केली आहे. नवीन नियमांनुसार आता अविवाहित विदेशी जोडप्यांना हॉटेलमध्ये एकाच रुममध्ये राहता येणार आहे. सर्वाधिक बंधने असलेल्या देशातील सरकारने कपल्सला एकत्र राहण्याची परवानगी दिल्याने पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात भेट देण्याची शक्यता आहे.

सौदी अरेबियामध्ये याआधी विदेशातून आलेल्या जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्यासाठी ते विवाहित असल्याचा पुरावा द्यावा लागायचा. म्हणजेच विवाह झाला आहे हे दाखवणे बंधनकारक होते. मात्र आता ही अट रद्द करण्यात आली आहे. यामागे पर्यटनाला चालना मिळावी हा उद्देश असल्याचे मानले जात आहे. परंतु हा नियम फक्त विदेशी जोडप्यांसाठी असणार आहे. स्थानिकांना जुन्या नियमानुसारच दोघांचा विवाह झाला असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. त्यानंतरच त्यांना रुम मिळणार आहे. दरम्यान, कपल्ससह एकट्या महिलांना (सौदीच्या महिलांनाही) हॉटेलमध्ये रुम बुक करण्याची परवानगी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे.

हॉटेल चेकिंगच्यावेळी नात्याचे प्रमाण सिद्ध करणारी कागदपत्र सौदी अरेबियाच्या नागरिकांना दाखवणे बंधनकारक असेल. पण, देशाबाहेरच्या जोडप्यांसाठी हे बंधनकारक नसेल. सर्व महिला ओळखपत्र दाखवून हॉटेलमध्ये रुम बुक करू शकतील. तसेच सौदीच्या महिलादेखील हॉटेलमध्ये रुम बुक करू शकतील, असे सौदी सरकारच्या पर्यटन आणि नॅशनल हेरिटेज मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top