Dailyhunt
आता सर्व महाविद्यालयांत साजरा होणार महाराष्ट्र दिन; युवासेनेचा दणका,विद्यापीठाला आली जाग

आता सर्व महाविद्यालयांत साजरा होणार महाराष्ट्र दिन; युवासेनेचा दणका,विद्यापीठाला आली जाग

सामना 1 week ago

मुंबई विद्यापीठाच्या सर्व संलग्न महाविद्यालयांमध्ये आता 'महाराष्ट्र दिन' साजरा केला जाणार आहे. हा निर्णय घेण्यासाठी शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना सिनेट सदस्यांनी विद्यापीठावर धडक देत 1 मे रोजी सर्व महाविद्यालयांमध्ये 'महाराष्ट्र दिन' साजरा करण्याचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती.

यानुसार अवघ्या दोनच दिवसांत विद्यापीठ प्रशासनाने परिपत्रक काढून सर्व महाविद्यालयांमध्ये 'महाराष्ट्र दिन' साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्र शासन आणि संचालक, उच्च व तंत्रशिक्षण यांच्याकडून महाराष्ट्र दिन सोहळा साजरा करण्याचे आदेश देण्यात येतात. असे असताना अनेक अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्र दिन साजरा केला जात नसल्याचे समोर आले आहे. याची गंभीर दखल घेत युवासेना सिनेट सदस्यांनी 27 एप्रिल रोजी विद्यापीठावर धडक देऊन कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांना निवेदन दिले होते.

असे आहेत निर्देश

विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागाचे संचालक-प्रमुख, संलग्न आणि स्वायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थेचे संचालक,
'आयडॉल', विद्यापीठाच्या रत्नागिरी, ठाणे, कल्याण व सिंधुदुर्ग उप परिसराचे संचालक यांनी महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिवस 1 मे रोजी साजरा करावा. यामध्ये विद्यापीठ प्रशासनाने 1 मे रोजी ध्वजारोहणासह इतर कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana