Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अभिजात मराठीचा अभिनव गौरवबिंदू, 'पुष्पाचे प्राक्तन'

अभिजात मराठीचा अभिनव गौरवबिंदू, 'पुष्पाचे प्राक्तन'

सामना 2 days ago

राठी रंगभूमीवर लवकरच भाषिक वैभवाचा एक अनोखा सोहळा रंगणार आहे. लेखक-दिग्दर्शक मिलिंद शिंत्रे यांच्या 'पुष्पाचे प्राक्तन' या सामूहिक गद्यकथनावर आधारित दीर्घांकाची रंगभूमीवर एंट्री होत आहे.

सात कलाकारांनी संपूर्ण पाठांतर करून सादर केलेला हा प्रयोग अभिवाचन नसून पूर्ण नाटय़ाविष्कार आहे. या दीर्घांकाचे वैशिष्टय़ म्हणजे यात 1750 शब्द आहेत आणि प्रत्येक शब्द 'प' या अक्षरापासून सुरू होतो. अनुप्रास अलंकाराचा इतका सुंदर प्रयोग जगात अस्तित्वात असलेल्या साडेसात हजार भाषांपैकी फक्त एका भाषेत, म्हणजेच मराठीत होत असून असा अद्वितीय आविष्कार मराठी भाषेच्या अभिजाततेचा ठसा उमटवणारा ठरतो.

या प्रयोगात सात गायक कोणत्याही वाद्यांशिवाय केवळ स्वरांच्या सहाय्याने गीते सादर करणार आहेत. कठीण शब्दांचे अर्थ प्रोजेक्शनद्वारे रसिकांपर्यंत पोहोचवले जाणार असून शंभर दिवसांच्या मेहनतीनंतर हा प्रयोग साकारला आहे. 'उद्गार' आणि 'मज्जासंस्था' निर्मित तसेच 'नाटय़संपदा कलामंच' प्रकाशित या दीर्घांकाचा शुभारंभ 12 जुलै रोजी पुण्यात होणार असून त्यानंतर मुंबईसह राज्यभर प्रयोग होतील. या अनोख्या प्रयोगाबद्दल लेखक-दिग्दर्शक मिलिंद शिंत्रे आणि नाटय़निर्माता अनंत वसंत पणशीकर यांचे अभिनंदन आणि विशेष कौतुक. मराठी भाषा प्रेमीजन आणि अभ्यासक यांच्यामध्ये या प्रयोगाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. सर्वांनी या प्रयोगाला भरभरून दाद द्यायला हवी. या नाटकाचा शुभारंभ रविवार 12 जुलै रोजी पुण्यात होतोय. त्यानंतर मुंबईसह इतर शहरात याचे प्रयोग होतील.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana