Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अभिनेत्री हुमा कुरेशी अडकणार लग्नबंधनात.

अभिनेत्री हुमा कुरेशी अडकणार लग्नबंधनात.

सामना 3 weeks ago

भिनेत्री हुमा कुरेशी गेल्या काही दिवसांपासून रचित सिंह याच्यासोबत प्रेमाच्या आणाभाका घेताना दिसत आहे. हाती आलेल्या बातमीनुसार हुमा कुरेशी लवकरच तिचा प्रियकर रचितसोबत लग्न करणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे या जोडप्याने अमेरिकेत गुपचूप साखरपुडा केला असून आता ते लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत.

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, हुमा कुरेशी आणि तिचा होणारा नवरा, रचित सिंह यांचे लग्न वर्षाखेरीस होणार असल्याची चर्चा आहे. ते दोघे मिळून ऑक्टोबर अखेरीस किंवा नोव्हेंबरमध्ये लग्नाची योजना आखत आहेत. लग्नासंदर्भातील कोणतीही बातमी हुमा किंवा रचित या दोघांनीही अधिकृतपणे जाहीर केली नाही. तरीही त्यांच्या लग्नसोहळ्याची तयारी मात्र जोरदार सुरू असल्याचे म्हटले जात आहे. वृत्तांनुसार दोघांनाही हा लग्नसोहळा साध्या पद्धतीने करायचे आहे, तर रिसेप्शन हे मोठ्या थाटामाटात करण्याची योजना आहे. लग्नाला फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित असतील. त्यानंतर मोठे रिसेप्शन होईल. सध्या तरी, लग्न मुंबईत होण्याची सर्वाधिक शक्यता आहे.”

‘थामा’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये एकत्र दिसल्यानंतर हुमा कुरेशी आणि रचित सिंग यांच्या नात्याच्या चर्चांना सुरुवात झाली. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात एकत्र दिसल्यानंतर या चर्चांना अधिकच जोर आला. सप्टेंबर २०२५ मध्ये, रचितने अमेरिकेत एका खाजगी समारंभात हुमाला लग्नाची मागणी घातल्याच्या बातम्या पसरल्या. हुमा कुरेशी यश-अभिनीत आणि गीतू मोहनदास-दिग्दर्शित ‘टॉक्सिक: अ फेअरिटेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिने एलिझाबेथची भूमिका साकारली आहे. तसेच ती टाॅक्सिक या आगामी चित्रपटामध्येही दिसणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana