Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अभिषेक शर्माला सुर गवसला, चौकार-षटकारांची बरसात; 91 चेंडूत 233 धावा चोपून काढल्या

अभिषेक शर्माला सुर गवसला, चौकार-षटकारांची बरसात; 91 चेंडूत 233 धावा चोपून काढल्या

सामना 5 days ago

झिम्बाब्वे दौऱ्यामध्ये अभिषेक शर्माकडून संघाला दमदार फलंदाजीची अपेक्षा होती. मात्र, त्याची बॅट तळपली नाही. त्यामुळे त्याच्यावर बरीच टीका सुद्धा झाली होती. मात्र, त्याने आता धमाकेदार पुनरागमन करत सर्वांची बोलती बंद केली आहे.

पंजाब स्टेट इंटर-डिस्ट्रिक्ट सीनियर वनडे टूर्नामेंटमध्ये अमृतसरकडून खेळताना अभिषेकने तरनतारनविरुद्धच्या सामन्यात चौकार-षटकारांची बरसात करत 91 चेंडूत तब्बल 233 धावांची विस्फोटक खेळी खेळली. या विक्रमी खेळीदरम्यान त्याने 15 चौकार आणि तब्बल 25 उत्तुंग षटकार ठोकले. तब्बल 256.04 च्या स्ट्राइक रेटने तो गोलंदाजांवर तुटून पडला होता.

या सामन्यात अभिषेकने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत अभय चौधरीसोबत पहिल्या विकेटसाठी 305 धावांची महाविशाल भागीदारी केली. अभयनेही 85 चेंडूत 93 धावांची दमदार साथ दिली. 25 व्या षटकापर्यंत अभिषेक बाद झाला, तरी यादरम्यान त्याने अमृतसर संघाला 50 षटकांत 8 बाद 533 धावांच्या डोंगरउभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली. या डावात सनराइजर्स हैदराबादचा फलंदाज सलील अरोड़ानेही 18 चेंडूत 39 धावांचे योगदान दिले.

अलीकडेच झिम्बाब्वे दौऱ्यावर T20 मालिकेत सलग अपयशी ठरल्याने (1, 8 आणि 2 धावा) अभिषेकच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र या स्थानिक पातळीवरील ऐतिहासिक खेळीने सर्व शंकांना पूर्णविराम दिला आहे. या तुफानी फॉर्ममुळे आता सप्टेंबरमध्ये जपान येथे होणाऱ्या एशियन गेम्स 2026 मध्ये टीम इंडियाकडून खेळताना अभिषेक काय कमाल दाखवतो, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana