Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अदानीला आव्हान देणाऱ्या 'वेदांता'वर ईडीचे छापे!

अदानीला आव्हान देणाऱ्या 'वेदांता'वर ईडीचे छापे!

सामना 3 weeks ago

दानीला न्यायालयात आव्हान देणाऱया अनिल अग्रवाल यांच्या वेदांता ग्रुपवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकले आहेत. ईडीने वेदांताच्या मुंबई व दिल्लीतील कार्यालयात आज झाडाझडती घेतली.

विदेशी चलन व्यवस्थापन कायद्यांतर्गत (फेमा) ही कारवाई करण्यात आली. डीमर्जरची प्रक्रिया सुरू असतानाच ही कारवाई झाल्याने वेदांता समूहाला धक्का बसला आहे.

वेदांता लिमिटेड या कंपनीकडून वेदांता रिसोर्सेस या कंपनीला रॉयल्टी पेमेंट करण्यात आले आहे. हा व्यवहार करताना नियमांचे पालन झाले नसल्याचा ईडीचा आरोप आहे. या आरोपांच्या चौकशीचा भाग म्हणून मंगळवारी छापे टाकण्यात आले. ईडीच्या अधिकाऱयांनी मुंबई, राजस्थान व दिल्लीतील कार्यालयात जाऊन विविध कागदपत्रांची तपासणी केली. या छाप्यातून ईडीच्या हाती नेमके काय लागले हे कळू शकलेले नाही.

वेदांताने या घडामोडींवर लगेचच प्रतिक्रिया दिली. 'देशातील सर्व कायदे आणि नियमांना आम्ही बांधील आहोत. त्यामुळे आमची भूमिका सहकार्याची आहे. ईडी अधिकाऱयांना हवी असलेली सर्व माहिती आम्ही देत आहोत,' असे वेदांताचे प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

काय आहे नेमके प्रकरण?

वेदांता लिमिटेड ही वेदांता समूहाची हिंदुस्थानी शेअर बाजारात नोंदणीकृत असलेली कंपनी आहे. तिचे बाजारमूल्य 1.30 लाख कोटी आहे. ब्रिटनमधील वेदांता रिसोर्सेस ही या कंपनीची मूळ कंपनी आहे. वेदांता रिसोर्सेवर तब्बल 74 हजार कोटींचे कर्ज आहे. वेदांता लिमिटेडकडून या पॅरेंट कंपनीला भरमसाट रॉटल्टी दिली जाते. हिंदुस्थानी कंपनीचा पैसा विदेशी कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी वापरला जात असल्याची चिंता गुंतवणूकदार व्यक्त करत आहेत. यामुळेच वेदांता ईडीच्या रडारवर आला आहे.

काय आहे अदानी-वेदांता वाद?

जेपी असोसिएट्स या कंपनीच्या अधिग्रहणावरून अलीकडेच वेदांता आणि अदानी समूह आमने-सामने आले होते. कर्जात बुडालेली जेपी असोसिएट्स ताब्यात घेण्यासाठी वेदांताने सर्वाधिक बोली लावली होती, मात्र संबंधित समितीने ही कंपनी अदानी समूहाला देऊन टाकली. त्या निर्णयाला वेदांताने लवादापुढे आव्हान दिले होते.

मोदींच्या मालकाला नडल्याचे फळ – काँग्रेस

ईडीचे छापे हे अदानींना नडल्याचे फळ आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली. 'धनदांडग्यांसाठी हा धडा आहे. तुम्ही मोदींचे कितीही काैतुक करा, कितीही भक्ती करा. पण त्यांचे मालक गौतम अदानी यांच्याशी पंगा घेतला तर किंमत मोजावी लागेल हा संदेश मोदींनी दिल्याचा आरोप प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana