Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अडीच वर्षांच्या चिमुरड्याच्या कंबरेत इंजेक्शनची सुई तुटली, कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील हलगर्जीपणा

अडीच वर्षांच्या चिमुरड्याच्या कंबरेत इंजेक्शनची सुई तुटली, कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील हलगर्जीपणा

सामना 4 days ago

ल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारादरम्यान वैद्यकीय हलगर्जीपणाचा प्रकार समोर आला आहे. कुत्र्याने चावा घेतलेल्या अडीच वर्षांच्या चिमुरड्याला रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देताना सुई तुटून ती त्याच्या कंबरेतच अडकून राहिली.

घरी गेल्यानंतर मुलाला तीव्र वेदना होऊ लागल्यानंतर खासगी रुग्णालयात काढलेल्या एक्स-रेमध्ये सुई शरीरात अडकल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शस्त्रक्रिया करून ती बाहेर काढण्यात आली.

कल्याण पूर्व येथील काका ढाबा परिसरात राहणारे सूर्यभान पांडे यांचा अडीच वर्षांचा मुलगा कावेश याला काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर उपचारासाठी त्याला केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन दिले. मुलाच्या आई काजळ यांनी इंजेक्शन देताना सुई तुटल्याचा संशय व्यक्त करून डॉक्टरांना याबाबत विचारणा केली. मात्र सुई खाली पडली असावी, असे सांगत मुलाला घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. घरी परतल्यानंतर काही वेळातच कावेशला खूप वेदना सुरू झाल्या आणि तो सतत रडू लागला. त्यामुळे घाबरलेल्या पालकांनी त्याला तातडीने सायन रुग्णालयात नेले. तिथे उपचार होऊ न शकल्याने अखेर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. खासगी रुग्णालयात एक्स-रे तपासणी केल्यानंतर मुलाच्या कंबरेत इंजेक्शनची तुटलेली सुई अडकल्याचे दिसले. त्यानंतर डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून ती सुई बाहेर काढली.

निष्काळजी डॉक्टरांवर कारवाईची मागणी

रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या मुलाला मोठा शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागल्याचा आरोप पांडे कुटुंबाने केला. आमच्या मुलासोबत जे घडले ते अन्य मुलांसोबत घडू नये यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पांडे कुटुंबीयांनी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana