पालिकेच्या मुलुंड येथील अगरवाल रुग्णालयाच्या डॉक्टर, अधिकारी, कर्मचाऱयांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासी इमारतीचा प्रश्न मार्गी लागला आहे. या कामाला पेंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यामुळे या ठिकाणी 38 मजली दोन तर 22 मजली एक इमारत बांधण्यात येत आहे.
या कामासाठी पालिका 222 कोटी रुपये खर्च करीत आहे.
रुग्णालयाच्या डॉक्टर, कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱयांच्या निवासाचा प्रश्न यामुळे मिटणार आहे. या प्रकल्पातील इमारतींमध्ये वन बीएचके, टू बीएचके व पह्र बीएचके फ्लॅट तयार करण्यात येत आहेत. मुलुंड येथील सीटीएस क्रमांक 1029 व 1030 या भूखंडावर सुमारे 3340.2 चौरस मीटर जागेत हा प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पात 'ए', 'बी' व 'सी' अशा तीन विंग असणार आहेत. इमारतींत बेसमेंट, ग्राउंड, चार पोडियम राहणार असून पार्पिंगची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. ऑक्टोबर 2027 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
असा आहे प्रकल्प
- विंग ए – 38 मजली इमारत, 128 (वन बीएचके) फ्लॅट्स
- विंग बी – 22 मजली इमारत, 56 (2 बीएचके) फ्लॅट्स आणि 1 (4 बीएचके) फ्लॅट
- विंग सी – 38 मजली इमारत, 190 वैद्यकीय अधिकारी रूम्स (सिंगल व ट्विन शेअरिंग)
- एकूण 374 निवासी घरे उपलब्ध होणार आहेत.
- सामायिक पोडियम, 10 लिफ्ट्स

