Dailyhunt
अजितदादांनी काँग्रेससोबत खांद्याला खांदा लावून काम केलंय, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करावी! - सुप्रिया सुळे

अजितदादांनी काँग्रेससोबत खांद्याला खांदा लावून काम केलंय, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करावी! - सुप्रिया सुळे

सामना 1 week ago

जित पवार यांच्या अपघाती निधानानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसला साद घातली आहे.

अजितदादांनी काँग्रेससोबत खांद्याला खांदा लावून काम केले आहे. आपल्या पक्षासोबत त्यांचे नेहमीच सौहार्दाचे संबंध होते, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी बारमतीची पोटनिवडणूक बिनविरोध करावी अशी मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी सकाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली होती. या भेटी दरम्यान त्यांनीही बारामतीची पोटनिवडणुकीतून काँग्रेस उमेदवाराने माघार घ्यावी अशी विनंती केली होती. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनीही या संदर्भात एक ट्विट केले.

अजितदादांना न्याय द्या! बारामतीत उमेदवार देऊन काँग्रेसचा संदेश, हर्षवर्धन सपकाळांच्या भेटीनंतर रोहित पवारांचे विधान, अर्ज मागे घेण्याची विनंती

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्युनंतर बारामती विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक लागली आहे. यापूर्वी अजितदादांनी काँग्रेससोबत खांद्याला खांदा लावून काम केले आहे. आपल्या पक्षासोबत त्यांचे नेहमीच सौहार्दाचे संबंध होते. या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणे ही अजितदादांना आदरांजली ठरेल. तरी माझी काँग्रेस पक्षाला नम्र विनंती आहे की कृपया आपण आपला उमेदवार मागे घेऊन ही निवडणूक बिनविरोध करावी, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana